IMPORTANT ANNOUNCEMENT

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणि नमोस्तुते ॥

Sunday, 16 January 2011

ANUBHAVS

|| हरी ॐ ||
             मी ह्या वर्षी गुरु पौणिमेला दर्शनासाठी येऊ शकलो नाही. कारण होते माझ्या खापर पणजोबांच्या पुण्यातीथीचे... खरे तर मला माहितच नव्हते की माझ्या खापर पणजोबांनी शिरोडा, जि. सिंधुदुर्ग येथे समाधी घेतली होती.
               मी काहीसा रागावलेलो कारण ही पहिली गुरु पौर्णिमा होती जी मला चुकणार होती कारण पुण्यतिथी जरी २३ ला होती तरी २४ जुलै ची टिकेट न मिळाल्याने मला २५ ला बसावे लागणार होते. (पुढे पावसाने रत्नागिरी मध्ये दरड कोसळून ट्रेन्स बंद पडल्या तो भाग वेगळा.. ज्या मुळे ट्रेन्स cancel होऊन मला बसने यावे लागले). 
              तरी पण मनात एक विलक्षण कुतूहल होते की आपल्याला आपल्या पूर्वजांची माहिती कळणार होती तेही अशा 'पुण्यवान श्रद्धावान' पूर्वजांची ज्यांच्या आशिर्वादाने व पुण्याईने ह्या जन्मात मला 'माझा बापू माझा सदगुरू' भेटला,
              तर अशा संमिश्र  भावना घेऊन मी माझ्या गावी गेलो, तिथे दोन दिवस राहून मग २३ जुलै रोजी पुण्यतिथी दिवशी 'शिरोडा' येथे ती समाधी पाहण्यास गेलो. प्रथम माउली देवी मंदिराचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यावर गावका-यानी बोलताना सांगितले की तुमच्या पणजोबांनी येथे प्रथम वारकरी संप्रदायाची स्थापना केली होती व त्यांनी अनेक जप तप करून अनेक कुटुंबाना भक्ती मार्गी आणले होते. ते सर्व ऐकताना मन भरून आले होते व समाधी पहायची इच्छा अजूनच तीव्र होत होती. समाधी दर्शन घेताना त्यांना श्रद्धापूर्वक नमस्कार केला व मनोमन म्हटले, "तुमच्या पुण्याई व आशिर्वादाने मला आज ह्या जन्मात 'माझा हरी... माझा विठू.. माझा बापू' भेटला व त्या सोबत देवयान पंथावर चालायची संधी ह्या जीवनात मिळाली  त्या बद्दल शतशः धन्यवाद."
             परत येताना मला परत वाईट वाटत होते की मला गुरु पौणिमा चुकली. बापू राया मला तुझे दर्शन नाही घेता आले. बापू विरहाने मन परत उदास झाले होते.
            सोमवारी मी परत मुंबईला दाखल झालो. पण तो विचार काही केल्या मनातून जात नव्हता. मग त्याच दिवशी सोमवारी रात्री मी झोपेत असताना मला स्वप्नात बापू दिसले. त्यांनी माझे दोन्ही हात हातात घेऊन म्हटले,"एवढी काळजी कशाला  करतोस..!!". काही समजायच्या आतच मला जाग आली व आनंदाने बापूंच्या फोटोच्या पाया पडून मी परत झोपी गेलो.
            आणि मग दुस-या दिवशी पासून blogs वाचायला सुरुवात केली तर त्यात ह्या वर्षीच्या गुरु पौर्णिमेची माहिती आणि फोटोज पाहायला मिळाली. आणि त्या youtube वरील दर्शनाचा video पाहून तर अजूनच आनंद झाला. मग पटले की मनात श्रद्धा असेल तर तो अकारण कारुण्यमयी बापू मार्ग देणारच अगदी १०८ टक्के.

श्री अनिरुद्धांचा,
योगेशसिंह परब.

99.jpg




--
DSC01051.jpg



-- 

Thanks and regards,
Yogesh S. Parab.

No comments:

Post a Comment

अवधूतचिंतन श्री गुरु देव दुत्त
OM NAMAS CHANDIKAYE